येथील रामलाल चौकातील गौरीशंकर अपार्टमेन्टमधील रहिवासी सौ. विजया राजेश बोब्बा यांच्या घरातून 17 ते 24 जानेवारी या कालावधीत रोख रक्कम 100,000 रुपयांची रोकड, एक सुमारे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, सुमारे प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अशा 20 ग्रॅम सोन्याचे अंगठ्या असा रुपये 5,00,000 रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचा गुन्हा शुक्रवारी, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल दाखल झाला.
या गुन्ह्याच्या तपासात कोणत्या प्रकारचे धागे-दोरे हाती नसताना, या गुन्ह्याच्या तपासात सहा. फौजदार औदुंबर आटोळे, पो.कॉ. सागर गुंड, पो.कॉ. अनमोल लट्टे, उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारांनी विजया बोब्बा यांच्या घरी काम करणाऱ्या महिलाकडे कसून तपास करुन त्या महिलेकडून गुन्ह्यातील 100 टक्के माल आहे, त्या परिस्थितीत जप्त करुन हा गुन्हा उघडकीस आणला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, निरीक्षक भालचंद्र ढवळे-पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि नितीन शिंदे, सहा. फौजदार औदुंबर आटोळे, पोहेकॉ संतोष पापडे, पोहेकॉ शहाजहान मुलाणी, पोहेकॉ सागर सरतापे, पोहेकॉ राजेश चव्हाण, पोकॉ सागर गुंड, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, सोमनाथ सुरवसे, मपोहेकॉ स्नेहा किणगी यांनी केली.