सोलापूर : महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विभागाच्यावतीने सोलापूर उर्दू घर व भारतीय कला प्रसारक ॲकॅडमी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उर्दू दिनानिमित्त मंगळवारी, २५ फेब्रुवारी रोजी सायं. ६.०० वाजता शिव छत्रपती रंगभवन येथे पद्मश्री सोमा घोष मोहम्मद अयाज यांचा रंगे गझल व महेफीले मुशायरा आयोजन करण्यात आला आहे.
या रंगे गझलमध्ये प्रसिध्द पद्मश्री पारितोषिक विजेत्या सोमा घोष व महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद अयाज हे आपल्या गझलांने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे व काव्य संमेलनात सोलापुरातील प्रसिध्द कवी आपले काव्य सादर करणार आहे.
या कार्यक्रमास मोनिका सिंग, सदाशिव दडदुणे, शमीम अब्बास, बशीर परवाझ, संतोष सिंग, आरजू राजस्थानी, शफी शत्तारी व आसिफ इक्बाल यांची उपस्थित राहणार आहे, तरी सोलापुरातील गझल व काव्य प्रेमी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर उर्दू घर सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. १ चे अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केलं आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सहप्रायोजक मनोरमा बँक परिवार सोलापूर तसेच लोक सहभागातून हा सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
