सोलापूर : सदर बझार पोलीस ठाण्याकडे दाखल चोरीचा गुन्हा गुन्हे प्रकटिकरण पथकानं अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणलाय. मौलाली चौक केशवनगरातील रहिवासी शहेबाज शौकत पठाण याच्या घरातून चोरीस गेलेली 1,50,000 रुपयांची रोकड व 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 4,46,000 रुपयांचा माल जप्त केलाय. या गुन्ह्यात जिबरान ऊर्फ शोएब युन्नुस शेख (वय-20 वर्षे, रा.मौलाली चौक, केशव नगर, झोपडपट्टी) याला गजाआड केलंय.
घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बझार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रगटीकरण पथकातील अंमलदार पोलीस हवालदार शहाजहाँन मुलाणी, पो.हे.कॉ. संतोष पापडे, पोलीस शिपाई हणमंत पुजारी, उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याच्या तपासात कोणत्या प्रकारचा पुरावा नसताना लेप्रसी कॉलनी, क्रिडा संकुलमागे सोमवारी 11.40 वा. च्या एक इसम हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन थांबलेला दिसला. 
त्याला संशयावरुन ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता, त्याने त्याचं नाव जिबरान ऊर्फ शोएब युन्नुस शेख असं असल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातील पांढऱ्या पिशवीची झडती घेतली असता, त्याच्याकडे रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून आले.
त्याच्याकडे मिळालेले सोन्याचे दागिने जिबरान ऊर्फ शोएब शेख याने रविवारी दुपारी केशव नगर येथे चोरी केल्याचे कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरण प्रमुख पोउपनि नितीन शिंदे यांनी गुन्ह्याच्या तपासकामी सोमवारी दुपारी अटक केली.
