दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
गरजू दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी व अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.