याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची सेवा २४ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना देय असणारी निवडश्रेणी प्रस्ताव मान्यतेकरीता दिनांक २५, ऑक्टोबर २०२३ रोजी योग्य मार्फतीने लोकसेवक घनश्याम मस्के यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता.
यासंबंधी तक्रारदार त्यांच्याकडे पाठ पुरावा करीत होते. त्तक्रारदार यांचे निवड श्रेणी मान्यतेसाठी लोकसेवक वरिष्ठ सहाय्यक घनश्याम मस्के यांनी यापूर्वीच ५ हजार रुपयांची लाच स्विकारुन ३० हजार रुपये आणून दिल्यावर मान्यतेसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले होते.
याप्रकरणी आलेल्या तक्रारीची पडताळणी कारवाईनंतर लोकसेवक मस्के यांनी ४० हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ३२ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपयांची स्वतः स्वीकारल्यावर रंगेहाथ पकडण्यात आले.
यासंदर्भात घनश्याम मस्के (रा. फ्लॅट नं. ३३. मरगु अपार्टमेंट, यशवंत मिल जवळ, अक्कलकोट रोड, सोलापूर) याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (लाप्रवि, पुणे.), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पडताळणी अधिकारी पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक (ला.प्र.वि. सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले (ला.प्र.वि., सोलापूर) पोलीस अंमलदार एएसआय/कोळी, पोना/संतोष नरोटे, पोकॉ/गजानन किणगी व चालक पोह/राहुल गायकवाड (सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडलीय.
... नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दूरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक, सोलापूर.
संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net
संपर्क टोल फ्री क्रमांक 1064
दूरध्वनी क्रमांक 0217-2312668