Type Here to Get Search Results !

माजी केंद्रीय मंत्र्यांच्या नातवाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण; शुक्रवारी "skyforce" देशभरात प्रदर्शित

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातु वीर पहारीया हे "skyforce" या सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. वीर पहारिया आणि  अक्षयकुमार आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असून, २४ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

१९६५ साली भारत-पाकिस्तानच्या वायु सेनेमध्ये झालेल्या युध्दाच्या आधारीत आहे. पठाणकोट आणि हलवार एअरबेसवर झालेल्या हल्ल्यावर हा चित्रपट चित्रीत केला आहे. येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिन अर्थातच २६ जानेवारीच्या पुर्वसंध्येपूर्वी एक दिवस अगोदर हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होत आहे.(रोहन नंदाने)