सोलापूर : धनगर समाजाचे नेते व महाशक्ती सामाजिक संशोधन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महावीर भागवत कोळेकर यांचे आकस्मित निधन झाले. ते मृत्यूसमयी ६४ वर्षीय होते.
गुरुवारी, १६ जानेवारी रोजी सकाळी रामलाल चौक येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघून पुणे नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
धनगर समाजात व महाराष्ट्रभर महावीर कोळेकर यांचा मोठा मित्रपरीवार आहे. त्यांच्या अकाली निधनावर मित्र परिवारानं दु:ख व्यक्त केलंय. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिणी असा मोठा परीवार आहे.