Type Here to Get Search Results !

श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची सांगता

सोलापूर :  'सिद्धरामेश्वर महाराज की जय' च्या घोषात योगदंडाची महापूजा व मानकरी हिरेहब्बू यांना आहेर करून दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यात श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची आज सांगता झाली.

सुरूवातीला योगदंडाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर सुधीर देशमुख व राजशेखर देशमुख यांनी योगदंडाला विभूती, हळद-कंकू लावले. त्यानंतर कळसाची पूजा होऊन हळद-कुंकू लावण्यात आले. त्यासमोर पान-सुपारी ठेवण्यात आली. योगदंडाला पुष्पहार घालण्यात आला. आरती करण्यात आली.

दूध, खीर, पुरण-पोळी, शेंगा चटणी, तीळ चटणी, कटाची आमटी, गाजर, मेथी, वांगी, घेवडा, गरगटा, ताकाची कढी, दही-शेंगा चटणी, तिळ चटणी, मिक्स पालेभाज्यांची पातळ भाजी  आदी पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सागर हिरेहब्बू, मनोज  हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू,  शिवशंकर हब्बू, अमित हब्बू, राजेश हब्बू, ओंकार हब्बू, गणेश हब्बू ' यांची पाद्यपूजा करून आरती करण्यात आली. होमाची पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, अभिराज देशमुख, क्षमा देशमुख, शिल्पा देशमुख, शीला देशमुख संगीता देशमुख, अनिशा देशमुख, उर्वशी देशमुख उपस्थित होत्या. हिरेहब्बू यांचा प्रसाद झाल्यानंतर बाराबंदी काढून त्यांना आहेर करण्यात आला.