सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या 344 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 16 जानेवारी रोजी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते व अॅड. बाबासाहेब जाधव, श्रीकांत घाडगे, नाना काळे, अमोल शिंदे, राजन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या 344 वा राज्यभिषेक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ध्वजवंदन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध अतिथींचा सत्कार करण्यात आला, तसेच आनंदोत्सव म्हणून समितीचे वतीने मिठाई वाटप करण्यात आली.
सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 70 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदात्यांना छत्रपती यांची मूर्ती भेट देण्यात आली.
यावेळी राज्याभिषेक समितीचे शिरीष जगदाळे, अमोल जाधव, बाळासाहेब गायकवाड, गोवर्धन गुंड, प्रकाश ननवरे, श्याम कदम, संभाजीराजे भोसले, अजय सोमदळे, छत्रुघन माने, श्रेयस माने, शेखर जगदाळे, सचिन चव्हाण, संतोष आतकरे, सोमनाथ राऊत, मोनाली धुमाळ, मनीषा कोळी, उज्ज्वला साळुंखे, लता ढेरे, माधुरी चव्हाण आदी उपस्थित होते.