उत्तर सोलापूर : तालुक्यातील मौजे होनसळ येथील डी.एम. प्री प्रायमरी, दिलीपराव माने प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतीय 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीपराव माने युवा मंचचे अध्यक्ष शिवलिंग गौडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होनसळच्या सरपंच सविता गायकवाड होत्या.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीमंत बंडगर, संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, पंचायत समिती माजी सभापती रजनी भडकुंबे, ह. भ. प. सुरेश पोखरकर, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, संस्थेचे सचिव विकास बनसोडे, संचालक पाटलोजी जानराव, लक्ष्मण जाधव, पोलीस पाटील आकाश कांबळे, डॉ. मारुती जाधव, होनसळच्या माजी सरपंच महादेवी पवार, भाग्यश्री धपाटे, अंगणवाडी सेविका साधना गायकवाड, शबाना पटेल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त कलाशिक्षक विनोद राऊत यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक उमेश जगताप सूत्रसंचालन सचिन नाईकनवरे तर तात्यासाहेब तांबे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, होनसळ, राळेरास, हगलूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.