संभाजी ब्रिगेडने बेघरांना ब्लॅंकेट वाटप करून दिली मायेची ऊब
सोलापूर : तरुणांनी अतिथी सेवा वृत्तीकडे वळले पाहिजे. समाजातील गरजवंतांना मदतीचा हात मिळाला पाहिजे. रंजल्या-गांजल्यांची सेवा हीच खरी सेवा आहे. सेवेतून समाधान मिळते. अशा स्तुत्य उपक्रमातून गरजवंतांना आधार मिळतो, असे मत संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांनी व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शनिवारी रात्री शहरातील विविध भागातील उपेक्षित बेघर, भिक्षेकरी, दिव्यांग व्यक्तींना थंडीपासून संरक्षण व्हावे, म्हणून ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे राहुल चव्हाण, तृप्ती चव्हाण यांच्या मातोश्री स्वर्गीय मंगल चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी श्याम कदम बोलत होते.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला शहराध्यक्षा मोनाली धुमाळ, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, उपाध्यक्ष मनीषा कोळी, उपशहरप्रमुख सीताराम बाबर, रमेश चव्हाण, मल्लिकार्जुन शेवगार, रमेश भंडारे, आकसर, सुमित मंद्रूपकर, गौरीशंकर वरपे, सिद्धार्थ राजगुरू, अजित पाटील, वैभव धुमाळ आदि उपस्थित होते.