Type Here to Get Search Results !

क्रॉसरोडवर पोलिसांच्या हाती लागलेल्या संशयिताकडून १४.७७ तोळे सोन्याचे आणि ८९.५३ तोळे चांदीचे दागिने जप्त

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस  अधिकारी पाटील व त्यांच्या तपास पथकाने मुळेगांव क्रॉस रोड परिसरात ७ जानेवारी रोजी पहाटे तोंडास मास्क लाऊन फिरत असलेल्या संशयितास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करता त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडी गुन्ह्याची कबुली दिली. राजकुमार पंडीत विभुते असं या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून १४.७७ तोळे सोन्याचे व ८९.५३ तोळे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील व त्यांच्या तपास पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडीत विभुते (वय-४३ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. बोरामणी) यास ताब्यात घेतल्यावर केलेल्या कौशल्यपूर्वक तपासात, त्याने, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीत भा.दं. वि. कलम-४५४, ४५७, ३८० अन्वये दाखल गुन्हा केल्याचे कबुली दिली.

त्या गुन्ह्यात अटक करून, गुन्ह्यातील गेला माल हस्तगत करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली. त्याने गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने काढून दिले. १४७.७ ग्रॅम (१४.७७ तोळे) सोन्याचे व ८९५.३ ग्रॅम (८९.५३ तोळे) चांदीचे दागिने असा सरकारी किंमतीनुसार ४,४८,३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप पाटील व तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अर्चना स्वामी, चालक सतिश काटे, नेताजी गुंड, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.