Type Here to Get Search Results !

जिद्द-चिकाटी असल्यास यश हमखास मिळते : जाहिद पिरजादे

अंजुमन-ए-इस्लाम इंग्लिश मीडियम शाळेचे स्नेहसंमेलन साजरे

सोलापूर : जग नवनवीन तंत्रज्ञानासह पुढे आगेकूच करत आहे. अशावेळी नव्या तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त करणे, हे गरजेचे बनले आहे. याबरोबरच जिद्द आणि चिकाटी असल्यास यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन पुणे येथील पर्सिस्टंट सिस्टम कंपनीचे इंजीनियरिंग लीड असिस्टंट मॅनेजर जाहिद पिरजादे यांनी केले. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त अंजुमन-ए-इस्लाम इंग्लिश मीडियम शाळेत संस्थेचे कोऑर्डिनेटर रियाज पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

प्रारंभी शाळेच्या प्रांगणात पत्रकार सादिक इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी असोसिएशनचे इम्तियाज कमिशनर, कार्यालयीन प्रमुख इम्तियाज हंजगीकर, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख रियाज जमादार, केंद्रप्रमुख इरफान सय्यद आणि शहबाज शेख आदी उपस्थित होते. 

सध्या विविध क्षेत्रांमध्ये कौशल्यपूर्वक शिक्षणानंतर अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी प्राप्त करताना अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण वेळ आणि जिद्द चिकाटी बाळगून पुढे मार्गक्रमण केल्यास निश्चितच उज्वल भविष्य साकारले जाऊ शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी काही वर्षासाठी मेहनत घेतल्यास यशस्वी जीवन जगता येणार असल्याचेही जाहिद पिरजादे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगान, मनोरंजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवितानाच भारत देशाची एकता, अखंडता टिकविणे आणि मोबाईल, सोशल माध्यमांचा होत असलेला भडीमार, तरुणांमधील व्यसनाचे सवयी यावर जनजागृती करून उपस्थित सर्वांची दाद मिळविली. सुमारे १०० विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. 

यावेळी प्राचार्या मेराज करजगीकर, रफत शेख, तस्लिम शेख, सबा शेख, फरीदा शेख, नसरीन शेख, अल्फा शेख, सुल्ताना शेख व अन्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.  

प्रास्ताविक इम्तियाज हंजगीकर, सूत्रसंचालन शिक्षिका सादिका कुरेशी, इरफान सय्यद आणि बिल्कीस सय्यद यांनी तर शेवटी शिक्षिका रुकसाना लालशेरी यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.