Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं निधन

पुणे : मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे गुरूवारी, २३ जानेवारी रोजी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. ते मृत्यू समयी १०१ वर्षीय होते. त्यांच्यामागे दोन कन्या,जावई,नातवंडे असा परिवार आहे.   

येथील पत्रकारनगरात शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर वैंकुठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलंय.