Type Here to Get Search Results !

समाजाच्या गरजा पूर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत : कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर

महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या प्रशिक्षण शिबीराचा समारोप

सोलापूर : भविष्यातील उद्योगव्यावसायातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन प्राध्यापकांनी कौशल्यआधारीत अभ्यासक्रम निर्माण करावेत. ज्यामुळे समाजाती नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकशीत करावीत, असे प्रतिपादन कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या कौशल्य विकास केंद्र आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यातून 40 प्राध्यापक उपस्थित राहिले होते. या प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर बोलत होते.

व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीच्या इन्क्लुजन अँड डायव्हरसिटी केंद्राचे प्रमुख मिथिलेश भाकरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, सह समन्वयक डॉ. श्रीराम राऊत, डॉ. अभिजित जगताप उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, भविष्यकाळात कोणत्या प्रकारचे रोजगार येतील आणि उद्योगक्षेत्रात कोणत्या कौशल्यांना मागणी आहे, याची प्राध्यापकांना जाणिव असणे आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रम हे नोकरीसाठी व उद्योगक्षेत्रातील आवश्यक असणार्‍या भूमिकेशी साधर्म्य साधणारे आवश्यक आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे कौशल्यही विकशीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालावर प्रक्रिया होऊन त्याचा फायदा शेतकर्‍यांना होईल, असेही डॉ. महानवर यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले, तर यावेळी मिथिलेश भाकरे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता गाजरे आणि श्रृति देवळे यांनी केले, तर डॉ. अभिजित जगताप यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. तेजस्विनी कांबळे, ऋषिकेश मंडलिक, तारिक तांबोळी, भैरव भुसारे, गणेश ननावरे, अमोल खंडागळे, रविंद्र कोरे, जय शिंदे, स्नेहल जानकर, अनिता धोंगडे, सोमनाथ वडरे, राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले.