Type Here to Get Search Results !

26 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण

सोलापूर : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्फत दरवर्षी जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार  देण्यात येत असतो, पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख बक्षिस 10 हजार रूपये देण्यात येणार आहे.

सन 2023-24 चे क्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.

गुणवंत खेळाडू पुरस्कार 2023-24, मुली- श्रेया मुकूंद परदेशी, शिक्षण बी.ए.

श्रेया मुकूंद परदेशी हिने धर्नुविद्या या खेळात  सन 2018 ते 2022 राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त तसेच राज्यस्तरिय शालेय क्रिडा स्पर्धेत 2018 ते 2023 महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करून अनेक पदके प्राप्त केली आहेत. या त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून  कार्याचे मुल्यमापन करून त्यांना सन 2023-24  गुणवंत खेळाडू जिल्हा क्रिडा पुरस्कार(मुली) देण्यात येत आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार 2023-24, मुले- श्रीगणेश प्रशांत उडता शिक्षण- 12 वी
यांनी 2023 साली राज्यस्तरीय शालेय डायव्हिंग क्रीडा स्पर्धेत 01 मीटर 03 मीटर व हायबोर्ड डायव्हिंग या खेळ प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच 2024 राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेला आहे. त्यांच्या या क्रिडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून कार्याचा मुल्यमापन करून त्यांना सन 2023-24 गुणवंत खेळाडू जिल्हा क्रिडा पुरस्कार (मुले) देण्यात येत आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार 2023-24, (दिव्यांग खेळाडू) – वैभवराज बापू रणदिवे शिक्षण 12 वी . कु. वैभवराज बापू रणदिवे या खेळाडूने 10 मीटर एअर पिस्टल शूटिंग (नेमबाजी) दुसऱ्या झोनल पॅराशुटींग चॅम्पियनशिप मध्ये जुनियर गटात गोल्डमेडल प्राप्त कलेले आहे. तसेच तिसऱ्या नॅशनल पॅराशुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जूनियर गटामध्ये सिल्वर मेडल ,इंटरनॅशनल शूटींग चॅम्पियनशिप ऑफ होनोहर (जर्मनी) या स्पर्धेत सीनियर गटात सहभाग व पहिल्या प्यारा खेलो इंडिया शूटींग स्पर्धेत ब्रांझ मेडल प्राप्त करण्यात आले आहे. त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील खेळाडू म्हाणून कार्याचा मुल्यमापन करून त्यांच्या सन 2023-24 गुणवंत दिव्यांग खेळाडू जिल्हा क्रिडा पुरस्कार देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली आहे.