सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांचं पार्थिव घेऊन एअर ॲम्बुलन्स लखनऊ विमानतळावरून बुधवारी, १५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता टेकऑफ केलेले आहे. साधारण तीन वाजता सोलापूर विमानतळावर एअर ॲम्बुलन्स पोहचेल, अशी शक्यता आहे.
त्यांचं पार्थिव जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात नागरिकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर मुरारजी पेठ येथील 'राधाश्री' निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल.
संध्याकाळी साडेपाच वाजता निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. जुना पुना नाका येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातील, असं सागण्यात आलंय.