श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२७ वी जयंती साजरी
सोलापूर : आज जगात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा साजरा होतो आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी दोन छत्रपती घडविले, या मातेचं सर्वांनी स्मरण करून त्यांचा विचार आत्मसात करणे अगत्याचे आहे. त्यांच्या चरित्राचे पारायण होणे आज काळाची गरज आहे, असे मत माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी व्यक्त केले.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने रविवारी, १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२७ वी जयंती साजरी झाली. प्रारंभी जिजाऊ वंदना होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जिवन चरित्र यांचे वाचन झाले.
यावेळी श्री शिवजनोत्सव महामंडळाचे वतीने ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे व उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता मुन्ना तळेकर यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, अंबादास ज्ञानेश्वर सपाटे, शिवश्री शेळके, शिवराम प्रतिष्ठानचे जितु वाडेकर, बजरंग जाधव, अंबादास सपकाळे, विजय पुकाळे, विजय भोईटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य गणेश डोंगरे, प्रा. संजय जाधव, प्रा. जीवन यादव, सचिन स्वामी, संदीप साळुंखे, कार्यालय प्रमुख देविदास घुले, राजू व्यवहारे, बसवराज कोळी, सखाराम साठे, मारुती सावंत, ललीत धावणे, शिवश्री बोरजंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. जिवन यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शेवटी शिवश्री सखाराम साठे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.