सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20 व्या वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळ्यात सोलापूर सोशल आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या उर्दू विभागातील विद्यार्थीनी मिसबाह मेहर मुसा मन्सूर शेख बी. ए. उर्दू मध्ये सुवर्णपदकाची मानकरी ठरलीय. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानूर यांच्या उपस्थितीत मिसबाह मेहर ला "प्राध्यापक मोहम्मद हनिफ इस्माईल खरादी सुवर्णपदक" प्रदान करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा वार्षिक दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थीनी मिसबाह मेहर मुसा मन्सूर शेख या विद्यार्थिनीनं यावर्षी बी. ए. उर्दूमध्ये सर्वाधिक गुण मिळवले. प्रा. मुहम्मद हनिफ इस्माईल खरादी यांच्या स्मरणार्थ हे सुवर्णपदक गेली अकरा वर्षे सातत्याने दिले जात आहे.
सोलापूर सोशल महाविद्यालयाच्या उर्दू विभागाने प्रारंभापासून या पदकावर आपला दावा कायम ठेवला आहे. बी. ए. आणि एम. ए. उर्दू विभागातील उर्दू विभागाने आतापर्यंत चौदा सुवर्णपदके मिळवून इतिहास रचला आहे.
याशिवाय विभागातील आजपर्यंत 40 विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावलं आहे. 23 विद्यार्थ्यांनी उर्दूमध्ये नेट आणि सेट परीक्षेत यश संपादन केलंय. 06 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ची पदवी प्राप्त केलीय.
या विद्यार्थ्यांना उर्दू विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. म. शफी चोबदार, उर्दू विभागाचे उपविभागप्रमुख बी. ओ. चेअरमन डॉ. गौस अहमद शेख यांचं मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य ई. जा. तांबोळी यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय.