सोलापूर : सोलापूर येथे सालाबाद प्रमाणे श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराजांची गड्डा यात्रा भरली आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असून, यात्रेत हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन अथवा सापडलेले बालक पोलीसांच्या मदतीने त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहोचविण्याकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बालसंरक्षण कक्ष अंतर्गत चाईल्ड लाईन 1098 ची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेशमा गायकवाड यांनी दिलीय.
तसेच ज्या बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे. अशा बालकांना सेवा येत असून, यात रस्त्यावरील बालके, बालकामगार शोषित बालके, देह विक्रिस बळी पडलेले बालके, व्यसनाधिन बालके, संषर्घग्रस्त बालके, मतिमंद बालके, एच.आय.व्हि./एड्स ग्रस्त बालके, आपत्ती ग्रस्त बालके, कौटुंबिक कलहास बळी पडलेले बालके, वैद्यकिय मदतीसाठी, निवाऱ्याच्या शोधात असलेले, हरवलेले बालके परत पाठविण्यासाठी, शोषणापासून संरक्षण, भावनिक मदत व मार्गदर्शन माहिती व संदर्भ सेवेकरीता कार्यरत असून जर अशी कोणती बालके निदर्शनास आल्यास तात्काळ होम मैदान पोलीस चौकीशी संपर्क साधवा अथवा चाईल्ड हेल्पलाईन च्या टोल फ्री नंबर 1098 वर कळवावे, असे आवाहनही जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रेशमा गायकवाड यांनी केले आहे.