सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे व मुलांच्या वसतिगृह, सोलापूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रिक मानधनावर पहारेकरी 02 (प्रत्येकी एक पद) पदे भरावयाचे आहे. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह गुरुवारी, 23 जानेवारी 2025 पूर्वी जिल्हा सैनिक कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
या पदासाठी पहारेकरी पदाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल, मानधन रुपये 20 हजार 886 रू. प्रतिमहा असेल. तसेच हे पद निवासी आहे. पहारेकरी पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवाराने रात्रीचा पहार देणे व मुक्कामी रहाणे आवश्यक आहे. पहारेकरी पद हे माजी सैनिक, युध्द विधवा , व माजी सैनिक विधवा पत्नी यांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह कार्यालयात सादर करावे.
पहारेकरी पदाकरीता 23, जानेवारी 2025 रोजी मुलाखत घेण्यात येईल, तरी उमेदवारांनी स्वत:ची मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. हे पद भरतीसाठी माजी सैनिक, युध्द विधवा, व माजी सैनिक विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिक युध्द विधवा व माजी सैनिक विधवा पत्नी उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल.
तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व गरजू माजी सैनिक, युध्द विधवा व माजी सैनिक पत्नी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.