सोलापूर : बुलेट दुचाकीवरील यापूर्वीचा भरणा न झालेला 3 हजार रुपयांचा दंड माफ करणे अन् सायलेन्सरचे 2 हजार रुपये दे, असं बोलून दुचाकीस्वाराकडे पैशाची मागणी केलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकानं दीड हजार रुपयांची लाच स्विकारल्याच्या गुन्ह्यात गुरुवारी रंगेहाथ पकडले. पो. कॉ. बसप्पा शिवाजी साखरे असं त्या कर्मचाऱ्याचं नांव आहे.
त्या बुलेट दुचाकीवरील यापूर्वीचा प्रलंबित असलेला 3 हजार रुपयांचा दंड माफ करणे अन् सायलेन्सरचे 2 हजार रुपये दे, असं बोलून दुचाकीस्वाराकडे पैशाची मागणी मागणी केली. त्यावेळी त्या वाहनधारकाने, 'त्यांना पावती मिळेल का, 2 हजार रुपयाची' अशी विचारणा केली.
त्यावर लोकसेवक पो.कॉ. साखरे यांनी त्याची पावती नसते, असं सांगताना पैसे लवकरात लवकर आणून दे, अशा प्रकारे लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1500 रुपये पो.कॉ. साखरे यांनी स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
तत्पूर्वी या प्रकरणी तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची पडताळणी करून रचलेल्या सापळ्यात पोलीस कॉन्स्टेबल बसप्पा साखरे दीड हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना रंगेहात सापडले. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
➡ नागरिकांना आवाहन
➡️ सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.
(गणेश कुंभार)
सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.
➡️ मो. क्र. 9764153999
➡️ कार्यालय क्र 0217-2312668
➡️ ईमेल dyspacbsolapur@gmail.com
➡️ Toll free no. 1064