Type Here to Get Search Results !

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञान प्रदर्शन आणि सायन्स मेळावा

 
सोलापूर  : क्रीडा व युवक सेवा, संचालनालय पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन अंतर्गत एनबीएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आज गुरुवारी, 05 डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन आणि सायन्स मेळावा पार पडला. 

या मेळाव्याचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळेस जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डाॅ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे, प्रदर्शन समन्वयक प्रा. व्ही. एस. शाखापुरे, परीक्षक डाॅ. नागेश नकाते, डाॅ. प्रशांत शिंपी, संजय जवंजाळ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार यांनी मानले. 

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. संकल्पना आधारित बाबींमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना 'इनोव्हेशन इन सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी' सन २०२४-२५ या वर्षासाठी निश्चित केले होते. यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील इंजिनिअरीग कॉलेज, वैद्यकीय महाविदयालय, कृषी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये शैक्षणिक संस्था इत्यादी युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवक व युवती यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले होते. 

यात विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 16 प्रकल्प सादर केले. यातून तीन प्रकल्पाची निवड केली जाणार आहे. त्यास रोख रक्कम, सन्मानपत्र  देऊन गौरविण्यात येणार आहे. यात सांघिक आणि वैयक्तिक असे प्रत्येकी तीन क्रमांक काढली. यातील सांघिक प्रकारात निवड झालेले संघ विभागीय स्पर्धेत पाठवले जाणार आहेत. 

निवडलेले प्रकल्प पुढे विभागीय स्तरावर पाठवण्यात येणार आहे. या विज्ञान मेळा प्रदर्शनात शेतीविषयक वनस्पती शिफारस आणि वनस्पती पानांचे रोग, तणनाशक, फवारणी यंत्र आणि खत यांच्या बॅटरीवर चालणाऱ्या संयोजनाचे नाविन्यपूर्ण मॉडेल, मार्केट यार्ड सोलापूरचे नियोजन व रचना, सोलापूर शहरासाठी भूजल तंत्राची रचना आणि मूल्यांकन, वाहन पार्किंग ऑटोमेशन सिस्टम, लोअर ट्रोपोस्फियर मापन आणि क्लाउड सीडिंगसाठी हवामान ड्रोनची रचना असे विविध क्षेत्रातील 16 प्रकल्प सादर केली.

या जिल्हास्तरीय युवा महोत्सव व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विज्ञान मेळा, लोकगीत, लोकनृत्य, कविता लेखन, कथा लेखन, मोबाईल फोटोग्राफी, चित्रकला व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. 

□ स्पर्धेतील निकाल

रोख रक्कम  आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

● वैयक्तिक प्रकार 

1) वैष्णवी गुलमिरे ( डी. बी. दयानंद काॅलेज, 03 हजार रुपये)

2) श्रृती ठोकळ (एनबीएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, 02 हजार रुपये )

3) सय्यद शहनवाज  (डी. बी. दयानंद काॅलेज,1500 रुपये)

● सांघिक प्रकारात तीनही क्रमांक एनबीएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने पटकावला. 

 1) प्रकल्प : कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आभासी माऊस

सहभाग विद्यार्थी - आदित्य बनसोडे, रितेश साळुंके, ओंकार जगताप (सात हजार रुपये)

2) प्रकल्प : तणनाशक, फवारणी यंत्र आणि खत स्प्रेडर यांच्या बॅटरीवर चालणाऱ्या संयोजनाचे अभिनव मॉडेल 

विद्यार्थी - दिनेश कदम, विजय वाघमोडे, शुभम आगलावे, गणेश देशपांडे (पाच हजार रुपये)

3) प्रकल्प : लोअर ट्रोपोस्फियर मापन आणि क्लाउड सीडिंगसाठी हवामान ड्रोनची रचना

विद्यार्थी -  निरंजन देशमाने,  आकाश कुंभार, अभिषेक मगर, वैभव हजारे  (तीन हजार रुपये)