सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील सावंतवाडी येथील संभाजी ब्रिगेड च्या जिल्हा संपर्क कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना 'एक वही-एक पेन' हा उपक्रम राबविण्यात येऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, प्रदीप गवळी, पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ गवळी, तलाठी सुधाकर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अभिमान सर्वगोड, अविनाश रणसुरे, भाऊ कसबे, आबा कांबळे, सुनिल आलाटे, विशाल अस्वरे, सुरज सर्वगोड,
सावकार गवळी, परमेश्वर सर्वगोड, अमोल सावंत, शेखर चौगुले, सुलेमान पिरजादे, सोहेल सय्यद, अजित चौगुले, बालाजी सावंत, सागर देवकुळे, सोमनाथ देवकुळे, विकास सावंत, अमर जगदाळे, चंद्रकांत माने, नारायण जगताप, अण्णासाहेब सावंत आदी उपस्थित होते.