Type Here to Get Search Results !

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना समता सैनिक दलाच्यावतीने अभिवादन

सोलापूर : समता सैनिक दल, शाक्य संघ आणि सिदनाक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी समता सैनिक दलाचे जी ओ सी अंबादास कदम, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके आणि सिदनाक ब्रिगेडचे प्रमुख मेजर कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

याप्रसंगी समता सैनिक दलाचे ज्येष्ठ सल्लागार अण्णासाहेब भालशंकर, महासचिव अनिल जगझाप ,  अंगद जेटीथोर, वसिष्ठ सोनकांबळे, संभाजी तळभंडारे, मुकुंद चंदनशिवे, सुधीर चंदनशिवे, चंद्रकांत कोळेकर, शांतिकुमार कांबळे, रत्नदीप कांबळे, कुणाल जानराव, विनोद जाधव, अरूण गायकवाड, सुनिता गायकवाड, सुमित्रा केरु जाधव इत्यादी उपस्थित होते.

शाक्य संघाच्यावतीने चोखा कांबळे, विजय कांबळे, गोपीनाथ कांबळे, शांताराम वाघमारे,  शशिकांत  बाबरे, गायकवाड इत्यादी तर सिदनाक ब्रिगेडच्यावतीने जयानंद कांबळे, प्रकाश घटकांबळे, शिवपुत्र घटकंबळे, मेजर कांबळे, मेजर गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रमोद केरु जाधव यांनी शिस्तबद्ध संचलन केले.