Type Here to Get Search Results !

कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सोलापूर : भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 व्या महापरिनिर्वाण दिनी कुमठे  प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, कुमठे येथे शिक्षण संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. दादाराव डांगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व कार्य याविषयी विचार व्यक्त केले. संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांसारखे वाचनाचा छंद जोपासावा व त्यांच्यासारखा अभ्यास करावा, असे विचार व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी वक्तृत्व गुण विकसित करावे व समुदायाच्या समोर आपली छाप कशी पाडावी, याविषयी विचार व्यक्त केले. 

प्रशालेचे पर्यवेक्षक वसंत गुंगे, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी सर्व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन लावंड सर यांनी केले. शेवटी संजय घोडके सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.