पुणे : जिल्ह्यातील इंदापूर कसबा पेठेतील सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक हजरत चांद शाहवली (र.) बाबांचा 460 वा ऊरूस शरीफ चा सोमवारी,09 डिसेंबर रोजी प्रारंभ होतोय. ऊरुस कमिटीच्या वतीने ऊरुसाची दर्गाह परिसरात विद्युत रोषणाईसह सर्व जय्यत तयारी करण्यात आलीय.
सोमवारी, 09 डिसेंबर रोजी संदल शरीफ, मंगळवारी, 10 डिसेंबर रोजी ऊरुस शरीफ आणि बुधवारी, 11 डिसेंबर रोजी झेंडा जिआरत अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उरुस कमीटीचे आझाद पठाण, हमीद आत्तार आणि महादेव चव्हाण यांनी सांगितलंय.