Type Here to Get Search Results !

कुमठे प्रशालेत क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 750 विद्यार्थ्यांची तपासणी

सोलापूर : कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेच्या मार्गदर्शिका तथा प्रभाग क्रमांक 26 च्या माजी नगरसेविका सौ. प्रिया जयकुमार माने यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 750 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

प्रथमतः शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन वैद्यकीय अधिकारी डाॅ. शैला सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड यांनी केले.

विद्यार्थ्यांनी रक्तवाढीसाठी हिरव्या पालेभाज्या, खजूर,  मोड आलेली कडधान्ये, फळे यांचा आहारात समावेश करावा, आरोग्यासाठी योगा, प्राणायाम तसेच नियमीत व्यायाम करावा, असं डाॅ. सरवदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले. आरोग्य संपन्न शरीर आपली प्रसन्नता वाढवते तसेच आपल्या बुद्धिमतेत वाढ होते, असंही त्यांनी आपल्या मनोगतात शेवटी सांगितले.

प्रशालेतील इयत्ता 05 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी, रक्त तपासणी  करण्यात आली. हिमोग्लोबिन, शुगर, थायरॉईड, तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मजरेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पी. एच. एन. निलोफर शेख, तुकाराम सुर्यवंशी, शबाना शेख, वंदना कांबळे, जोती गायकवाड, मनोज सोनकांबळे, जावेद शेख, लॅब टेक्नीशियन भिमाशंकर बावगे, मोबीन शेख, मल्लिकार्जुन राफेली व आशा वर्कर, सर्व स्टाफ यावेळेस उपस्थित होता.याप्रसंगी 750 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमास पर्यवेक्षक वसंत गुंगे, प्रा. संजय जाधव, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सुत्रसंचालन सौ. सुवर्णा धारेराव मॅडम यांनी केले, तर संजय घोडके यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.