बुधवारी, ११ डिसेंबर रोजी सोलापूर रेल्वे स्टेशन परीसरात प्रवाशाची एक बॅग हे रेल्वे स्टेशन येथील सफाई कामगार श्रीमती जया परशुराम दंडाले (रा. मोदीखाना, सोलापूर) यांना मिळाली असता, त्यांनी स्टेशनवरील इतर प्रवाशांकडे चौकशी केली, मात्र कोणी मालकी असल्याचं सांसून ती बॅग घेतली नाही. ती बॅग मूळ मालकाला मिळावी, या हेतूने सफाई कामगार जया दंडाले यांनी प्रामाणिकपणे पोलीस कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी केलेल्या सत्कार प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार बोलत होते.
त्या बॅगेत बॅगेमध्ये पाहिले असता रोख रक्कम, एक मोबाईल, एक घड्याळ, दोन गॉगल, एक पाकीट व इतर महत्वाचे कागदपत्र आणि कपडे असल्याने सदर बॅग सफाई कामगार जया दंडाले यांनी प्रामाणिकपणे ज्यांचे आहे, त्यांना मिळावे या उद्देशाने पोलीस पो. शि./ ३०५ आनंद प्रकाश गडदुरे (नेम- गुन्हे शाखा) यांचे कडे हजर केली.
पोलीस शिपाई आनंद गडदुरे यांनी चौकशी करुन माहिती घेतली असता, सदर बॅग मालकाचे नाव विकास रामेश्वर (मोबाईल नं. ९७३९९३७७०० रा. R/O- H.No- ४/१५५, लोहरी बिल्डींग, सराफ बाजार, मकटामपुर, बालाजी मंदिर जवळ, गुलबर्गा, कर्नाटक) यांची असल्याचे निष्पण्ण झाले. त्यांना बोलावून घेतले. बॅग मधील-
१) २५,४०० रुपये रोख रक्कम,
२) १८,००० रुपये किंमतीचा एक ओपो रेनो ७ कंपनीचा मोबाईल,
३) ७,८०० रुपये किंमतीचा अॅपल कंपनीचे एअर पॉड,
४) ६,५०० रुपये किंमतीचे एक टायटन कंपनीचे घड्याळ,
५) दोन गॉगल असे
पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी महिला सफाई कामगार जया परशुराम दंडाले व पोशि ३०५ आनंद प्रकाश गडदुरे, यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन त्यांचा सत्कार केला.