Type Here to Get Search Results !

पोलीस कर्तव्य मेळावा राज्यस्तरीय स्पर्धेत श्वान ' स्नुफी ' चा द्वितीय क्रमांक

सोलापूर :  06 ते 12 डिसेंबर या कालावधीत 19 वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत पोलीस आयुक्तालय, सोलापूर आस्थापनेवरील " स्नुफी " या श्वानास घेऊन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. या स्पर्धेत ' स्नुफी ' श्वानाने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत श्वान पथक सोलापूर कडील " स्नुफी "या श्वानाने "वस्तुच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणे व वासावरून गुन्हेगाराला ओळख परेडमध्ये ओळखणे " या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यामध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला.

ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा)  डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त,(गुन्हे) व राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक सोलापूर शहरकडील सफौ/लक्ष्मण साबतेबुवा गणगे, पोह/205 शिवानंद सिद्रामप्पा कलशेट्टी व पोशि/1209 रतन बाबासाहेब गनुरे यांनी केली.

....... चौकट 

ठळक कामगिरी

हस्तक - प्रथम हस्तक-सफौ लक्षमण गणगे

दुय्यम हस्तक - पोह/२०५ शिवानंद कलशेट्टी 

श्वानाने गुन्हे शोधकचे प्रशिक्षण श्वान प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे पूर्ण करून २५ ऑक्टोबर २०१९ रोजी दाखल झाले आहे. तेव्हापासून अनेक गुन्हे उघडकिस आणण्यास मदत केली. त्यातील काही, उघड घरफोडींच्या गुन्हयांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

१) MIDC PS/CR No. १९/२०२१ भादंवि कलम ४५४,४५७,३८० श्वानाने ज्वेलरी बॉक्सच्या वासावरून गुन्हेगाराचा शोध लावला.

२) JBPS/CR No. ३९९/२०२१ भादंवि कलम ३०२ श्वानाने चप्पल व दगडाच्या वासावरून आरोपीचे घर दाखविले.

३) नुकताच पार पडलेल्या १९ वा पोलीस कर्तव्या मेळावा २०२४ मध्ये वस्तुच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणे, व वासावरून गुन्हेगाराला ओळख परेडमध्ये दाखविणे यामध्ये श्वानाने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला.