सोलापूर : खो-खो या खेळाचे प्रमुख आश्रयदाते खासदार शरदचंद्र पवार यांचा 12 डिसेंबर वाढदिवस हा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्याचं आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने केले होते. त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यात खो-खो दिन खेळाडूंचा सत्कार, नियमाची माहिती, मैदानावर रांगोळी काढून, पणत्या लावून व पूजन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा कणबस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळगी, जिल्हा परिषद शाळा विंचूर, वसंतराव काळे प्रशाला, कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लब वाडीकुरोली (ता. पंढरपूर), छत्रपती शिवाजी विद्यालय वीट (ता. करमाळा), साकत प्रशाला बार्शी, लोकविकास क्लब वेळापूर, अर्धनारी नटेश्वर क्लब वेळापूर (ता. माळशिरस), छत्रपती खो-खो क्लब मरवडे (ता. मंगळवेढा), उत्कर्ष क्रीडा मंडळ सोलापूर येथे हा दिन साजरा करण्यात आला.