सोलापूर : सोलापूर गुजराती मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व ट्रस्टी स्व. महेंद्रभाई लक्ष्मीचंद शाह यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार व साहित्यकार सौरभ शाह (मुंबई) यांना रविवारी, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी मंडळाचे अध्यक्ष मुकेशभाई मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मंचावर उपाध्यक्ष मणिकांत दंड, सचिव जयेश पटेल, खजिनदार चिमणभाई पटेल, तरंग शाह, केतन शाह, कौशिक शाह व सह सचिव संदीप जव्हेरी उपस्थित होते. एकवीस हजार रूपये, शाल, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्रारंभी सचिव जयेश पटेल यांनी स्वागत केले. कौशिक शाह यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक अध्यक्ष मुकेश महेता यांनी केले. संदीप जव्हेरी यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी उपाध्यक्ष मणिकांत दंड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी केतन शाह, सौ. ज्योती शाह, तरंग शाह सह बिपिनभाई पटेल, केशवभाई राम्भीया, रमेशभाई गोरडिया, खजिनदार चिमणभाई पटेल, युवा फोरम चे अध्यक्ष हितेश माधु, सचिव पार्थ दावडा, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रीती शाह, सचिवा अर्पिता बक्षी, समन्वयिका सौ. स्वाती देसाई आदी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी : गुजराती मित्र मंडळाचा स्व. महेंद्रभाई शाह स्मृती गौरव पुरस्कार अध्यक्ष मुकेश महेता यांच्या हस्ते स्विकारताना सौरभभाई शाह. शेजारी डावीकडून तरंग शाह, केतन शाह, उपाध्यक्ष मणिकांत दंड, खजिनदार चिमणभाई पटेल, सचिव जयेश पटेल, कौशिक शाह व सह सचिव संदीप जव्हेरी छायाचित्रात दिसत आहेत.