सोलापूर : शहरातील जोडभावी पेठ (खणी) येथील सामाजिक कार्यकर्ते सावळाराम तुकाराम शिंदे यांचे रविवारी,29 डिसेंबर रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते मृत्यूसमयी 76 वर्षाचे होते. सायंकाळी अक्कलकोट रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे आधारवड, संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री यमाईदेवी आश्रम शाळेचे खजिनदार होते. उद्योजक दीपक शिंदे यांचे वडील तर ज्येष्ठ पत्रकार शंकर जाधव यांचे ते भावजी होत.