मोहोळ : जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर, आरोग्य केंद्र शिरापूरचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमित गायकवाड यांच्या मार्गर्शनाखाली संपूर्ण मोहोळ तालुक्यात 100 days TB campaign programm चे आयोजन करण्यात आलंय. त्याचा प्रारंभ शनिवारी येथील उपकेंद्रात करण्यात आला.
यावेळी मोहोळ तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, आपला दवाखाना तालुका मोहोळ मार्फत शनिवारी, 7 डिसेंबर 24 ते 24 मार्च 25 या जागतिक क्षयरोग दिनापर्यंत तालुक्यामधील सर्व अतिजोखीमग्रस्त भाग, विट भट्टी, खाण कामगार, आश्रम शाळा, वृध्दाश्रम, सोलापूर जिह्यातील सर्वात मोठी चिंचोली MIDC येथील सर्व कारखाने व कामगार तसेच पोस्ट covid, co-morbid रुग्ण यांचे स्क्रिनिंग व 1000 स्पुटंम व किमान 250 X ray करायचं मानस डॉ.अरुण जी पाथरुडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन तसच उद्धाटन मोहोळ ग्रामीण रुग्णाल्याचे डॉ. जिलानी खान, शिरापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.काळे, प्रमुख अथिती म्हणून सरदारबी नर्सिंग इन्स्टिट्यूट मोहोळचे डॉ.नासीर खान यांच्या समवेत launching झाले आहे.
या नितीन जाधव sts मोहोळ, नितीन कुलकर्णी (आरोग्य सहाय्यक, Phc Shirapur) व उपकेंद्र मोहोळ येथील सर्व आरोग्य कर्मचारी अश्विनी बनसोडे, CHO, श्रीमती धोत्रे सिस्टर, विनिवाले, कोरबू, माळी, नागेश गोरवे, सुधाकर कांबळे , सर्व AF madam, आशाताई उपस्थित होते.