Type Here to Get Search Results !

भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन दक्षता जन जागृती सप्ताहाचा प्रारंभ

" सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्र समृध्दी "

" सत्यनिष्ठा की संस्कृति से राष्ट्र की समृध्दि "

"Culture of Integrity for Nation's Prosperity"

राज्यात प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित "दक्षता जनजागृती सप्ताह

सोलापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून यावर्षी सोमवारी, २८ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर या दरम्यान  "दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. त्याप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगिकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्था यांच्यामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचे करण्याचे नियोजित आहे.

या सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या अनुषंगाने अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर कार्यालयातर्फे खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

१) २८ ऑक्टोबर २०२४ रोजी जनजागृती सप्ताहाची भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुख यांनी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचे निर्मुलन करुन मुल्याधिष्ठीत सेवा निष्ठापूर्वक पुरविण्याबाबत सामुदायिक प्रतिज्ञा घेतली.

शपथ घेतल्यानंतर राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविणेत आला.

२) समाजातील निष्कलंक स्वयंसेवी संस्था व अशासकीय संघटना, सेवाभावी संस्था, स्वातंत्र्य सैनिक, स्त्री संघटना, रिक्षा/ट्रक संघटना, माल वाहतुक संघटना, सामान्य नागरिक यांना दक्षता जनजागृती मोहीमेत सहभागी करुन घेणार आहोत. व भ्रष्टाचार निर्मुलनासंबधीचे स्टिकर्स सार्वजनिक वाहनांना लावण्यात येत आहेत.

३) सोलापूर शहर व जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात व सार्वजनिक ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनासंबंधी भित्तीपत्रके व फलक लावण्यात येणार आहेत.

४) जनतेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यपध्दतीची माहीती व्हावी तसेच जनतेमध्ये जागृती व्हावी, यासाठी आकाशवाणी केंद्र, वृत्तपत्रे, केबल चॅनल, व्हॉटस अॅप ग्रुप व यु ट्युब या प्रसार माध्यमाच्या मदतीने जनजागृतीबाबत नागरिकांना लाचेची तक्रार देण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.

५) सोलापूर शहर व जिल्हयातील गावातील गर्दीचे ठिकाणी व महत्त्वाचे चौकात, एस.टी. स्टॅण्ड व इतर सार्वजनिक स्थळी भ्रष्टाचार विरोधात जागृती निर्माण व्हावी, यासाठी डिजीटल बोर्ड, भित्तीपत्रके चिटकविण्यात येवून सामान्य जनतेस माहीतीपत्रके वाटप करणार आहोत.

सर्वसामान्य नागरिकात भ्रष्टाचाराविरोधात जागृती निर्माण व्हावी तसेच अँन्टी करप्शन ब्युरोची कार्यप्रणाली व कार्यपध्दती याविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने गाव पातळीवर भित्तीपत्रके लावून माहीतीपत्रके वाटप करण्यात येतील. तसेच आठवडा बाजाराचे दिवशीही विविध गावांमध्ये भित्तीपत्रके लावून माहीतीपत्रके वाटप करण्यात येत आहेत.

भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीकरीता सप्ताहामध्ये आयोजित केलेले कार्यक्रम सर्वसामान्य जनतेमध्ये पोहचविण्यासाठी आपला सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे, असं पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी म्हटलंय

कार्यालयाचा पत्ताः अॅन्टी करप्शन ब्युरो, कार्यालय, सोलापूर, छत्रपती रंगभवन हॉल पाठीमागे, रंगभवन चौक, सोलापूर- ४१३००३

तक्रार नोंदविण्याकरीता :
टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १०६४,
फोन. नं.०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.
तसेच ईमेल आयडी : dyspacbsolapur@gmail.com वर तक्रार नोंदवावी, असंही आवाहन करण्यात आलंय.