Type Here to Get Search Results !

गांवचे सुपुत्र शहीद स्व. शिवराम चौगुले यांना स्मृतिदिनी अभिवादन


सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव चं नांव आपल्या बलिदानानं सुवर्णाक्षरात लिहून देशासाठी वीरगती प्राप्त झालेले सुपुत्र स्व. शिवराम विश्वनाथ चौगुले यांच्या ३१ व्या स्मृतिदिनी शनिवारी, ०२ नोव्हेंबर रोजी शहीद स्व. शिवराम चौगुले यांच्या स्मृतिस्मारकास पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.


जम्मू- काश्मीरातील बारामुल्ला जिल्हा, बुदन गांवी दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यावर १९ मराठा लाईट इन्फ्रंटीच्या  तुकडीनं केलेल्या कारवाईत अतिरेक्यांच्या अंधाधूद गोळीबारात स्वतः जखमी अवस्थेत असूनही पकडलेल्या अतिरेक्याला स्व. शिवराम चौगुले यांनी कंठस्नान घालून ०२ नोव्हेंबर १९९३ रोजी देशासाठी प्राणार्पण केलं, त्यांचं बलिदान देशाच्या भावी पिढ्यांना  प्रेरणादायीच आहे.


त्यांच्या स्मृतिदिनी, ०२ नोव्हेंबर रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत कासेगांव पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, दक्षिण सोलापूर तालुका भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते केदार विभूते, नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक दिलीपराव चौगुले, हुतात्मा शिवराम विश्वनाथ चौगुले यांचे चिरंजीव प्रविण चौगुले, सरपंच यशपाल वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या जागतिक महायुध्दात (१९१४-१९१९) वीरगती प्राप्त झालेले गुलाब शेख (ब्रिटीशकालीन स्मृतिस्मारकावर नामोल्लेख नाही) आणि शहीद शिवराम चौगुले यांच्या स्मृतिस्मारकाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर २ मिनिटांची स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामपंचायत सदस्य शहाजहान शेख, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार संजय पवार, माजी अध्यक्ष निशिकांत पाटील, रामहरी चौगुले, अल्लाऊद्दीन शेख, माजी सरपंच जनार्दन काळे, शंभू महादेव ग्रामीण पतसंस्थेचे संजय जाधव, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक महादेव चौगुले, पोपट जाधव, विलास वाडकर, शिवदास वाडकर, अभिमन्यू माने, विश्वजीत चौगुले, मधुकर चिवरे (वडजी), सहदेव कांबळे, रविंद्र जाधव, लक्ष्मण पवार यांच्यासह ग्रामपंचायतीचे अनेक सदस्य आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.


... यांनीही अर्पिली आदरांजली !

हुतात्मा स्व. शिवराम चौगुले यांच्या स्मृतिस्मारकाला

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रशिद बाणे वाले,
पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज भंडारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश कोणदे, सागर कत्ते, सुरेश माळगे, उळेचे उपसरपंच नेताजी खंडागळे, दत्ता डांगे, मनोज बचुटे, नाना शिंदे, गजेंद्र ननवरे यांनी ही पुष्पांजली अर्पित करुन आदरांजली वाहिली.