सोलापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जमीर शेख यांनी आपल्या समर्थकांसह मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची शनिवारी, ०२ नोव्हेंबर रोजी अंतरवली सराटी येथे भेट घेतलीय. या भेटीत अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील राजकीय तसेच सामाजिक परिस्थितीवर चर्चा केली.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देऊन प्रहार ने अनेकांना झटका दिलाय. या दोन्ही मतदारसंघातील जातनिहाय परिस्थितीचा लेखा-जोखा जमीर शेख यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यासमोर मांडला.
त्याच अनुषंगाने राज्यातील अनेक मातब्बर उमेदवार हे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे येत असल्याने त्या धर्तीवरच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा अक्कलकोटचे उमेदवार जमीर शेख यांनी अक्कलकोट आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत चर्चा करून मतदार संघाची परिस्थिती मांडल्याचे प्रहारकडून सांगण्यात आलंय.