बारामती : येथील विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची जिल्हाध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छापर भेटीत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्यासमवेत सोलापूर जिल्ह्याचा एकंदरीत आढावा जाणून घेतला. यावेळी पक्ष संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत खासदार तटकरे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सोशल मीडिया विभाग अध्यक्ष वैभव गंगणे, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे यांची उपस्थिती होती.