सोलापूर : सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केरू रामचंद्र जाधव यांचे सोमवारी, ०४ नोव्हेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते मृत्यूसमयी ६३ वर्षांचे होते.
सोलापूरच्या धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असणारे सेवानिवृत्त पीएसआय केरू रामचंद्र जाधव हे समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सक्रीय ज्येष्ठ कार्यकर्ते होते.
अत्यंत कष्टातून शिक्षण घेत ते पोलीस खात्यात रुजू झाले होते. त्यानंतर प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सेवा बजावल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती. पाच वर्षांपूर्वी ते याच पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगा, सुना, नातवंडे, एक भाऊ असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील राहत्या घरापासून निघून त्यांच्या पार्थिवावर जुना कारंबा नाका भागातील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.