सोलापूर : वीर राणी कित्तूर चेन्नम्मा यांच्या ऐतिहासिक विजयाच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकार 23, ऑक्टोबर रोजी त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय लिंगायत महामंचाचे अध्यक्ष मा. विजयकुमार हत्तुरे यांनी राज्यातील लिंगायत समाजाच्या वतीने भारत सरकारचे हार्दिक अभिनंदन केलं आहे.
वीर राणी कित्तूर चेन्नम्मा यांच्या ऐतिहासिक विजयाच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकार 23 ऑक्टोबर रोजी त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिराधित्य शिंदीया यांनी एका पत्रकान्वये दिलीय.