Type Here to Get Search Results !

अशी आहे, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या २७ स्टार प्रचारकांची यादी


मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केलीय. त्यात  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह २७ जणांचा समावेश आहे. 

उर्वरित स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेले ज्येष्ठ सिने अभिनेते सयाजी शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार नितीन पाटील, आमदार अमोल मिटकरी, अल्पसंख्याक नेते जल्लाउद्दीन सैय्यद, युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवाडी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, श्रीमती सुरेखा ठाकरे, उदयकुमार आहेर, शशिकांत तरंगे, वासिम बुर्‍हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे आदींचा समावेश आहे.