२० वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर मेजर राहुल जाधव सेवानिवृत्त

shivrajya patra


मोहोळ : सीमा सुरक्षा बल येथे २० वर्षांची प्रदीर्घ आपली देशसेवा बजावल्यानंतर मोहोळ तालुक्यातील गलंदवाडी येथील  मेजर राहुल राजेंद्र जाधव सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने गलंदवाडी ग्रामस्थांच्या वतीने सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते मेजर जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

मेजर राहुल जाधव यांचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण हे केम येथे झाले. मेजर जाधव यांचे वडील राजेंद्र जाधव व आई यांना नेहमी वाटायचे कि, आपल्या मुलाने देशसेवेत कार्यरत होऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे , त्यांच्या विश्वासाला सत्यात उतरवीत राहुल पहिल्याच प्रयत्नात देश सेवेत रुजू झाले.


२००४ साली सैन्यात भरती झालेले मेजर जाधव यांनी आजवर जम्मू-काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिसा, त्रिपुरा, गुजरात अशा दुर्गम ठिकाणी आपली देशसेवा इमाने-इतबारे बजावली. आपल्या गावासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याने मेजर जाधव यांची ग्रामस्थांनी मोटरसायकलवरून रॅली काढत त्यांच्या कर्तव्याला सलाम केला. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजिंक्यराणा पाटील, मेजर चंद्रकांत राऊत, मेजर सोमनाथ भिलार, तात्यासाहेब मासाळ, पो. पा. अनिल माने, आबासाहेब माने, दादा माने, सिद्धेश्वर मेटकरी, अण्णा सुळे, रामेश्वर शिंगाडे, अतुल शिंदे, मनोज मस्के, तात्या गोफणे, रंगनाथ माने, ज्ञानेश्वर माने, अक्षय थिटे, पोलीस पाटील विठ्ठल थिटे, बंटी पाटील  यांच्यासह समस्त गलंदवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर क्षिरसागर यांनी केले तर उमाकांत जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

To Top