Type Here to Get Search Results !

गुन्हे करणारी टोळी ०२ जिल्ह्यातून तडीपार

सोलापूर : गैरकायद्याची मंडळी जमवून साथीदारांसह दंगा-मारामारी करणे, घातक शस्त्रांसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या भिंगारे कुटुंबातील चौघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता हद्दपार करण्यात आलंय.

टोळीतील संतोष दत्तात्रय भिंगारे (वय-५४ वर्षे), ऋतिक संतोष भिंगारे (वय-३२ वर्षे), यश संतोष भिंगारे (वय-२१ वर्षे) आणि तुषार संतोष भिंगारे, (वय-२२ वर्षे, सर्व रा. घ.नं. ७३, पश्चिम मंगळवार पेठ, काशी कापडी गल्ली, सोलापूर) यांच्याविरुध्द

सन २०२०, २०२१ व २०२४ या कालावधीमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असून फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून त्यांचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांच्याकडं सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांनी कार्यवाही करुन २४ ऑक्टोबर रोजी, टोळीतील संतोष दत्तात्रय भिंगारे, (वय-५४ वर्षे), ऋतिक संतोष भिंगारे (वय-३२ वर्षे),  यश संतोष भिंगारे, वय-२१ वर्षे, ४. तुषार संतोष भिंगारे, वय-२२ वर्षे, सर्व रा. घ.नं. ७३, पश्चिम मंगळवारपेठ, काशी कापडी गल्ली सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय. या चौघांना तडीपार केल्यानंतर अहमदनगर येथे सोडण्यात आलं आहे.