सोलापूर : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा कार्यालय, नांदेड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूल (सी.बी.एस. ई.) च्या मानस गायकवाड ची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालीय.
राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात मानस सुमुख गायकवाड याने उत्कृष्ट खेळ करत ०६ पैकी ४.५ गुण मिळवित तिसरा क्रमांक प्राप्त करून आपले महाराष्ट्र संघातील स्थान निश्चित केले. आता राष्ट्रीय स्पर्धा मध्य प्रदेश येथे होणार आहेत. त्याला क्रीडा शिक्षक सचिन ढवण, राजकुमार माने आणि प्रशिक्षक उदय वगरे यांचं मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सौ. सायली जोशी, मुख्याध्यापिका सौ. अपर्णा कुलकर्णी, सौ. अचला राचर्ला, सौ. ममता बसवंती यांनी कौतुक करत अभिनंदन केलं असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.