सोलापूर : शहरातील मोटार सायकल चोरी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन शहर गुन्हे शाखेकडील स. पो. नि. श्रीनाथ महाडिक व त्यांच्या तपास पथकास खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचे आधारे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात २ आरोपींना गजाआड केलंय. उभयतांनी मोटरसायकल चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिलीय. त्यांच्या ताब्यातून ०१,२०,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
मोहमद गौस म.आझम (वय-३६ वर्षे, रा.१४५, जी.एम. कॉलनी, हास्मानाबाद, बनलागुडा, राज्य-हैद्राबाद, सध्या रा. क्रांतीनगर झोपडपट्टी समोर, मरीआई चौक, सोलापूर) आणि सिध्दु व्यंकय्या चौघुले (वय-४० वर्षे, रा. मड्डी वस्ती, वडार गल्ली, हनुमान मंदिर बाजुला, सोलापूर) त्यांची नावे असून 15 ऑक्टोबर रोजी मोहम्मद आझम याच्या ताब्यातून फौजदार चावडी पोलीस ठाणे आणि सांगोला पोलीस ठाण्याकडील चोरीच्या 02 दुचाकी जप्त करण्यात आल्या तर सिद्धू चौगुले यांच्या ताब्यातून जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील चोरीच्या गुन्ह्यातील 01 दुचाकी तसेच चोरीचा 01 मोबाईल 13 ऑक्टोबर रोजी हस्तगत करण्यात आलीय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि श्रीनाथ महाडिक, पोलीस अंमलदार-अंकुश भोसले, राजकुमार वाघमारे, शैलेश बुगड, अभिजित धायगुडे यांनी पार पाडली.