NTPC सोलापूरकडून ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल शिक्षणासाठी संगणक दान
सोलापूर : " केवळ वीज निर्माण करणे आमचे ध्येय नाही, तर समुदाय सक्षमीकरण करणे आहे. शिक्षण हे शाश्वत प्रगतीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. ही बाब लक्षात घेऊन NTPC 10 संगणक आणि प्रिंटर शाळेला भेट म्हणून देत असल्याचे प्रतिपादन NTPC चे महाव्यवस्थापक तपन कुमार बंदोपाध्याय यांनी केले.
ग्रामीण भागातील शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, NTPC सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाअंतर्गत, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावातील जिल्हा परिषद शाळेला 10 संगणक आणि 01 प्रिंटर दान केले आहे.
या उपक्रमामुळे या भागातील तीन जिल्हा परिषद शाळांना फायदा होईल, ज्या मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. शाळेने एकत्र संगणक प्रयोगशाळा स्थापन करण्याचे ध्येय ठेवले आहे, ज्याचा फायदा केवळ या शाळांना नाही तर परिसरातील इतर जिल्हा परिषद शाळांनाही होणार आहे.
या योगदानाचे औपचारिक उद्घाटन सोहळ्याला सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि NTPC सोलापूरचे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार बंद्योपाध्याय उपस्थित होते.
हा उपक्रम NTPC सोलापूरच्या जबाबदार कॉर्पोरेट नागरीकत्वाच्या व्यापक बांधिलकीचे प्रतिबिंब आहे, तसेच शिक्षणाच्या परिवर्तनशील शक्तीवर त्यांचा विश्वास दर्शवतो. आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा पुरवून, NTPC हे सुनिश्चित करत आहे की, ग्रामीण विद्यार्थी डिजिटल युगात मागे राहणार नाहीत, असंही महाव्यवस्थापक बंदोपाध्याय यांनी यावेळी सांगितले.
..... चौकट .....
डिजिटल युगात विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी साधने उपलब्ध करणे महत्वाचे : प्रीतम यावलकर
ग्रामीण भारतात डिजिटल अंतर कमी करण्यासाठी तंत्रज्ञान अधिक महत्त्वाचे आहे. "आजच्या जगात तंत्रज्ञानाचा प्रवेश लक्झरी नसून गरज बनला आहे," डिजिटल युगात विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करून अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी NTPC सोलापूरच्या CSR दृष्टिकोनाचे यावेळी कौतुक केले.