सोलापूर : नवरात्र महोत्सव-2024 निमित्त सोलापुर शहरात व कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापूर-तुळजापूर महामार्गावर सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याचे मत झाल्याने, महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142/ (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सोलापूर महानगरपालिका हद्दीतील व सोलापूर-तुळजापूर या मार्गावर श्री क्षेत्र रुपाभवानी मंदीरापासुन पुढे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश पुढील प्रमाणे आहेत.
दसरा (विजयादशमी) निमित्त 12 ऑक्टोबर रोजी सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किरकोळ देशी व विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद राहतील.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त, 15 व 16 ऑक्टोबर 2024 या दोन्ही दिवशी सोलापूर-तुळजापूर या मार्गावर श्री क्षेत्र रुपाभवानी मंदीरापासून पुढे तुळजापूर मार्गावर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या सर्व देशी - विदेशी किरकोळ मद्य विक्री व ताडी अनुज्ञप्त्या विक्रीसाठी पूर्ण दिवस बंद राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश दिले आहेत.