Type Here to Get Search Results !

दरोड्याच्या तयारीत असलेली अंतरराज्य टोळी गजाआड; दरोड्याच्या साहित्यासह चोरीचे १०६ मोबाईल हस्तगत


सोलापूर : विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोशि अमृत सुरवसे व पोशि समाधान मारकड नवरात्रीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना ०३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास पुणे पासिंग असलेली पांढऱ्या रंगाची एर्टिगा एम.एच. 13-TD-2258 ही गाडी संशयितरित्या हत्तुरे वस्ती येथे दिसून आली. तिचा पाठलाग करून घेतलेल्या झाडाझडतीत दरोडा घालण्यासाठी लागणारे साहित्य, एर्टीगा कार असा १३,६१,५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्या परप्रांतीय टोळीने गुन्ह्यासाठी वापरलेल्या कारमध्ये चोरीचे १०६ मोबाईल हस्तगत करण्यात आले.

पोशि सुरवसे व पोशि मारकड यांना या गाडीचा संशय आल्याने त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून ते वाहन  सपोनि गायकवाड व पोहेकॉ सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोशि संतोष माने, सद्दाम आबादीराजे, स्वप्निल जाधव, हरिकृष्ण चोरमुले यांच्या मदतीने संशियत एर्टिगा पत्रकार भवन येथील सुरभी हॉटेलच्या समोर अडवून विशाल कृष्णाप्पा बंडीवडार (वय-२९ वर्षे, रा- कुमारेश्वर नगर कोर्टाच्या पाठीमागे, ता. हनगल जिल्हा हावेरी, राज्य कर्नाटक) आणि अनिल शिवप्पा - वड्डर (रा. नवनगर, मैलारी देवी मंदीरजवळ, ता, हनगल, जिल्हा हावेरी, राज्य कर्नाटक) यांना ताब्यात घेण्यात आलंय.

त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारे एक निळ्या रंगाची मुठ असलेला लोखंडी मोठा कटर, एक गुलाबी मुठ असलेली लहान लोखंडी कटर, एक जुने लोखंडी पत्रे कापण्याचे कटर, एक केसरी रंगाचा लोखंडी कुऱहाड, एक निळ्या एक्सा ब्लेड, एक लोखंडी कटावणी, एक हिरवी मुठ असलेली स्क्रू ड्रायव्हर, एक हिरव्या रंगाचे इलेक्ट्रीक कटर मशिन, लाल तिखट न्यु पेपर मध्ये बांधलेली, एक लोखंडी हातोडी विविध कंपनीचे ५ मोबाईल असे एकूण १३,६१,५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उपरोक्त अटक आरोपीतांनी व त्यांच्या पळून गेलेल्या साथीदारांनी दरोडा टाकण्याकरिता आणलेल्या एर्टिगा कारच्या पाठीमागील हॅन्डरेस्ट व पत्र्याच्या मोकळ्या जागेत पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चोरी केलेल्या १०६ विविध कंपनीचे महागडे मोबाईल जप्त केले. जप्त केलेल्या मोबाईलसंबंधी अधिक तपास चालू असल्याचे सांगण्यात आलंय.

कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, अन्य पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड, पोनि श्रीमती संगिता पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि गायकवाड, पोहेकॉ सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोकॉ अमृत सुरवसे, समाधान मारकड, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, स्वप्निल जाधव, राहुल विटकर, रमेश कोर्सेगाव व मोबाईल तांत्रिक विश्लेषक आयाज बागलकोटे व अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली.