Type Here to Get Search Results !

प्रा. रामेश्वर लोंढे यांचे निधन


सोलापूर : जुळे सोलापूर येथील रहिवासी प्रा. रामेश्वर नामदेव लोंढे यांचे मंगळवारी, ०१ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वा. च्या सुमारास वयाच्या ६६ वर्षी निधन झाले.

दयानंद महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख होते. तसेच श्री शिक्षण प्रसारक मंडळी सोलापूर संचलित या संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच शालेय समितीचे माजी अध्यक्ष होते. 

त्यांच्या पार्थिवावर बार्शी तालुक्यातील कासारी या मुळगांवी बुधवारी, दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. 

त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, भाऊ, वहिनी,  पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे.