Type Here to Get Search Results !

स्व. काशिनाथ इटकर यांचा जयंतीदिवस श्री बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत साजरा


सोलापूर : येथील श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळ, सोलापूर या संस्थेचे संस्थापक स्व. काशिनाथ इटकर यांचा जयंतीदिवस श्री बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत स्पर्धात्मक विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

प्रारंभी संजीवकुमार इटकर यांच्या हस्ते स्व. काशिनाथ इटकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व पाढे लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.



यावेळी मुख्याध्यापक शामराव वाघमारे, अरविंद कुलकर्णी, बालाजी दिकोंडा, सुरेश इटकर, इक्बाल जमादार आणि नागेश चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी केले.